कोरेगाव भिमाची लढाई
कोरेगाव भिमा या गावात नदीच्या काठावर झालेली ही एक ऐतिहासिक लढाई आहे. हि लढाई १ जानेवारी इ .सन १८१८ रोजी इंग्रज व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्प्रश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या मराठा समाज अस्त झाला. कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ ...
Comments
Post a Comment